AROGYA RAKSHAK

Friday, 5 January 2018

03/04/2016 डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त काल नवयुवक भिमजयंती मंडळ खोब्रागडे नगर नांदेड , डॉ.सैमुअल हैनिमन होमीओपॅथीक क्लिनीक वसरणी नांदेड व आरोग्य रक्षक बहुउदेशीय सेवाभवी संस्था नांदेड अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर खोब्रागडे नगर येथे घेण्यात आले. या शिबीरात 150 रूग्नाची मोफत तपासणी व होमीओपॅथीक औषधोपचार करण्यात आले. या शिबिरात प्रमुख पाहूने म्हणून नवल पोकर्णा (नगरसेवक) , आशोक उमरेकर (नगरसेवक) , माधवदादा जमदाळे, केशव मोकळे, शिवराम जोंधळे उपस्थित होते . तसेच या शिबिरात आरोग्य रक्षक बहुउदेशीय सेवाभवी संस्था नांदेड चे संस्थापक अध्यक्ष आरोग्य रक्षक डॉ.संतोष जटाळे यांनी विविध आजारावर चित्रफीती द्वारे मार्गदर्शन केले व 15 तरूण आरोग्य रक्षकाची नोंदणी करण्यात आली जेणेकरून हे आरोग्य रक्षक समाजाच्या आरोग्य ची रक्षा करतील . हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य रक्षक डॉ. निरजन खाणसोळे, आरोग्य रक्षक डॉ. गजानन मोहिते, आरोग्य रक्षक समिर जटाळे, आरोग्य रक्षक मनोज पतंगेे, आरोग्य रक्षक नवल जोधंळे, आरोग्य रक्षक किशोर भुजबल, आरोग्य रक्षक सुमेद सरोदे, आरोग्य रक्षक अहेमद शेक, आरोग्य रक्षक प्रमोद जोधंळे, इत्यादीनि मेहनत घेतली .










No comments:

Post a Comment