AROGYA RAKSHAK
Saturday, 6 January 2018
17/096/2017 20 वर्षा पासून वाचन संस्कृती जपणारे व सामाजीक संस्थे ला मदत करणारे नांदेड येथील सत्तर वर्षीय तरूण श्री.बसवराज शंकरअप्पा कडगे. वर्तमान पात्रातून आपल्या आरोग्य रक्षक संस्थेच्या कामाची दखल घेत त्यांनी आपल्याशी सम्पर्क साधला व आज आम्ही त्यांची त्यांच्या घरी भेट घेतली. एक अगल वेगळ व्यक्तिमत्व, समाजाची जान असणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या घरी भव्य दिव्य वेगवेगळ्या ग्रंथाचा साठा ग्रंथालया सारख लावला आहे. समाजाला वाचण्याची आवड निर्माण करण्या करीता समाजाच्या घरी सायकल वर जावून पुस्तके मोफत वाटतात. रोज आपल्या अरोग्या साठी नित्य नियमांने योगासने व सायकलिंग करतात. सामाजिक संस्थेला आपल्या परीने मदत करतात. दरमहा आपले पैसे जमा करून एखाद्या समाजसेवी संस्थेला , अनाथश्रम, दान करितात. आजच्या या भेटीत विविध विषया वर चर्चा झाली. त्यांनी आपल्या आरोग्य रक्षक संस्थे च्या कामाबद्दल मार्गदर्शन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या . अशा या सत्तर वर्षीय तरूणाला आरोग्य रक्षक संस्थेचा सलाम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment