AROGYA RAKSHAK
Thursday, 6 May 2021
12/3/2021 आरोग्य रक्षक सेवा भावी संस्था नांदेड़ द्वारे आज सौ राजश्रीताई हेमंत पाटील यांची भेट घेण्यात आली . आरोग्य रक्षक संस्थेच्या मार्फ़त पहिला होम्योपैथीक रिसर्च सेंटर व्हाव अशी मागणी करण्यात आली व होम्योपैथी बद्दल चे मुद्दे मांडण्यात आले तरीही ताईनी सर्व मुद्दे समझून घेत मि आदरणीय खासदार साहेब हेमंत भाऊ मार्फ़त जी काय मदद करता येईल ती सर्व करेल असा आश्वासन दिला या वेळेस सोबत संस्थेचे अध्यक्ष डॉ संतोष जटाले सर ,डॉ आकाश शंकर खरे, व समाज सेवक स्वराज भाई यादव दिसत आहे
5/2/2021 आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,नांदेड. यांच्या तर्फे जिल्हापरिषद शाळा तळणी येथील विध्यार्थ्याना sanitizer व mask वाटप करण्यात आले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ.संतोष जटाळे यांनी आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी तसेच संस्थेचे सदस्य डॉ.साईराज गुंडाले, पार्थ जटाळे व गजानन कुल्थे यांची उपस्थिती होती.
5/7/2020 सफाई कर्मचारी यांना होमिओपॅथी गोळ्या, हॅन्डवाॅश, व मास्क चे वाटप* वसरणी येथे आरोग्य रक्षक सेवाभावी संस्था व शुध्दोधन कापसीकर यांच्या वतीने कोरोना योद्धे सफाई कर्मचारी यांना होमिओपॅथी गोळ्या, हॅन्डवाॅश, व मास्क चे वाटप करण्यात आले. देशासह जगभर कोव्हीड 19 या विषाणूचे सावट आहे.या संकटकाळी परिस्थितीत नागरी स्वच्छतेचे कार्य करणारे महानगरपालिका सफाई कर्मचारी यांना मदतीची सलामी देण्यासाठी आरोग्य रक्षक सेवाभावी संस्थेच्या वतीने अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले यासह हॅन्डवाॅश व मास्कचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संतोष जटाळे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पञकार संरक्षण समिती दक्षिण विभाग प्रमुख चे अध्यक्ष प्रशांत बारादे हे उपस्थित होते. सफाई कर्मचारी यांनी इतरांची काळजी घेत असताना आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे मनोगत डाॅ.संतोष जटाळे सरांनी केले. कार्यक्रमास सुदर्शन गजभारे, सचिन वसरणीकर व सफाई कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गजभारे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक शुध्दोधन कापसीकर यांनी केले.
1/7/2020 जाहीर आवाहन 🙏🙏 कोरोना व लॉकडाउन च्या अटीतटी च्या काळात आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड च्या सदस्य यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण नांदेड जिल्यातील विविध भागात मोफत अन्नदान , मास्क वाटप , औषधी वाटप व आरोग्याशी निघडीत , कार्यक्रम उस्फुर्त पने राबवले. या कामाची दाखल घेत संस्थे ने असा ठराव घेतलेला आहे कि , आरोग्य राक्षक संस्थे चे सदस्य व जे सदस्य नाहीत तरी सुद्धा विविध मार्गाने आरोग्य रक्षण केले अशा व्यक्तींना आरोग्य रक्षक योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात यावा . जेणे करून त्यांचे मनोबल वाढेल व भविष्यात निरोनी भारतासाठी आरोग्याची रक्षा करतील . याच अनुसंघाने आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड आपल्याला जाहीर आवाहन करते कि आरोग्य राक्षक संस्थे चे सदस्य व जे सदस्य नाहीत अशा व्यक्तींनी , संघटनांनी , व संस्थेनी आपल्या कार्याचा संपूर्ण तपशील उदा . फोटो व व्हिडीओ संस्थे च्या व्हाट्सअप मोबाइल 9975045161 यावर दिनांक ०५/०७/२०२० पर्यंत पाठवावा.
Subscribe to:
Posts (Atom)