AROGYA RAKSHAK

Thursday, 6 May 2021

17/6/2020 आज सुशांत सिँह राजपूत सारख्या तरुण कलाकाराने आत्महत्या करणे हे समाजासाठी खूप दुःखाची घटना आहे . प्रथम दर्शनी याचे कारण डिप्रेसनं असे समजते. डिप्रेशन चे मुख्य कारण इच्छा व समजदारीपना यात समतोल राखण्याच्या अभाव. या संदर्भाने माझा जुना लेख आपल्या पुढे सादर करीत आहे . • आजाराचे मूळ कारण * आज आपण पहात आहोत जीवन विविध आजाराने ग्रासत चालले आहे. २० वर्षापूर्वी जे क्रॉनिक आजार दिल्लीत असायचे ते आजार आज गल्लीत पोहचले आहेत. (उदा) मधुमेह, कॅन्सर, हृदयविकार, मुत्राशयाचे आजार इ. आजारांची श्रृंखला दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज आपण निरोगी व रोगी व्यक्तीचा अभ्यास केल्यास असे दिसून येईल- निरोगी व्यक्तीच्या प्रमाणापेक्षा रोगी व्यक्तीचे प्रमाण जास्त आहे व तसे वाढत आहे. शास्त्राप्रमाणे विचार केला तर मनुष्य मरेपर्यंत निरोगी राहणे त्यांचा अधिकार आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला, तर असे दिसून येईल की, निरोगी राहणे हा मनुष्याचा अधिकार आहे. तर मनुष्य आजारी का पडतो किंवा मनुष्य रोगी का होतो. याच प्रश्नाला घेऊन आज मी माझा लेख प्रदर्शित करीत आहे. जगातील विविध वैद्यकीय शास्त्रात रोग कसे निर्माण होतात. या विषयावर थेरी लिहून संशोधन केले. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा असेल, तर हिपोरकेट, आयुर्वेद, अॅटीपॅथी आयसोपेॅथी, नॅचरोपॅंथी, युनानी, अॅलोपेथी, होमिओपॅथी या सर्व शास्त्राची उत्पती रोगी व्यक्तीला निरोगी करण्यासाठी झाली. आपण या सर्व शास्त्राचा अभ्यास केल्यास असे दिसून येईल की हे सर्व शास्त्र आपापल्या थेअरीनुसार रोगाला निरोगी करण्यासाठी प्रामाणिक व योग्य प्रयत्न करीत आहेत. मी एक होमिओपॅथीक तज्ञ असल्यामुळे आपल्या समोर होमिओपॅथीक थेअरीनुसार मानवी शरीरात रोग कसे निर्माण होतात, हे पाहू, जेणेकरून त्या कारणांवर मात करून आपण निरोगी राहू शकतो. होमिओपॅथी हे शास्त्र जगातील प्रचलित शास्त्र असून या शास्त्राचा शोध जर्मनीमध्ये डॉ. सॅम्युएल हॅनेमन यांनी लावला. डॉ. हॅनेमन यांनी ऑग्रॅनन ऑफ मेडिसिन हा ग्रंथ लिहिला व या ग्रंथामध्ये रोग म्हणजे काय? रोग कसे होतात? रोगावर अचूक औषधी कशी शोधायची ? व होमिओपॅथीक शास्त्राची नियमावली दिसून येते. डॉ. हॅनेमन नंतर अनेक होमिओपॅथीक संशोधकाने आँग्रनन ऑफ मिडिसीन ग्रंथाला साध्या व सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रामुख्याने डॉ..हेंरिग, डॉ. बोर्निंगहोसेन, डॉ. बोगर, डॉ. केन्ट यांचा उल्लेख होतो. यामध्ये डॉ. केन्ट यांनी डॉ. हँनेमन यांच्या ऑरगेनन ऑफ मिडिसीन या ग्रंथावर आधारित केन्ट फिलोसॉपी या ग्रंथाचे लिखाण केले. डॉ. केन्ट यांनी या ग्रंथात मनुष्याला रोग का होतात. या विषयावर आपले मत मांडले. याआधी एक उदा. पाहुया आपल्या सर्व सामान्य जिवनाशी निगडीत आहे. जगातील बरेच लोक वेळेवर जेवण करतात, व्यायाम करतात, डॉक्टरांकडून चेकअप करतात, कसलेही व्यसन करत नाही, रोज सकाळी लवकर उठवतात, लवकर झोपतात तरीसुद्धा बहुतेकदा ते अचानक आजारी पडतात व विचार करतात की मी आजारी का पडलो. माझे काही चुकल का? या उदा. विचार केल्यास असे दिसून येईल की या व्यक्तीने शरीर विज्ञानाला महत्त्व दिले. पण, मानसिक विज्ञानाचा विचार केला नाही. डॉ. हॅनेमन, डॉ. केन्ट यांनी मानसिक विज्ञानावर भर देत असे म्हटले आहे, 'जु-नाट आजारांमध्ये मनुष्याचे विचार आधी बिमार पडतात व नंतर शरीर बिमार पडते.' आता आपण पहुया मनुष्य बिमार पडतो म्हणजे नेमके कोण बिमार पड़तो? डॉ. केन्ट यांच्या मते 'मनुष्य म्हणजे मनातील इच्छा व समजदारीपण जो व्यक्तीची इच्छा व समाजदारीपणा यात समतोल ठेवतो तो म्हणजे निरोगी. आता आपण सामान्य व्यवहारातील उदाहरण पाहुया समजा एक महाविद्यालयातील तरूण मुलगा त्याला नवीन मोबाईल घेण्याची खूप इच्छा असते व तो आपल्या वडिलांकडे त्याची मागणी करतो. वडिल त्याला पुढील आठवड्यात नवीन मोबाईल घेऊन देतो असे म्हणतात पण पुढील आठवड्यात काही कारणास्तव मोबाईल घेऊन देऊ शकत नाही. समजा त्या मुलाकडे इच्छा व समजदारीपणा चा समतोल असेल, तर तो शांतपणे वडिलाचा निर्णय स्वीकारतो व निरोगी राहतो.. पण तो मुलगा समजदार नसेल किंवा इच्छा व समाजदारीपणा समतोल नसेल, तर तो रागात येईल, चिडचिड करेल, दुःखी होईल, रडेल व भांडण करेल किंवा ताणतणावामध्ये जाईल व तो आजारी पडेल. होमिओपॅथी शास्त्रामध्ये जुनाट आजाराची सुरुवात सोरा या विषा पासून सुरूवात होते. मनुष्य जेव्हा निसर्गाच्या नियमाचा अपमान करातो व इच्छा, समजदारीपणामध्ये समतोल राखत नाही, तेव्हा 'सोरा' या विषाची निर्मिती होते व मनुष्य आजारी पड़तो. काही दिवसाने हा आजार शरीरावर दिसायला लागतो व त्वचा रूपात दिसायला लागतो. नंतर तो बेगबेगळ्या अवयवांमध्ये दिसायला लागतो. उदा.१) आईवडिलांची इच्छा असते आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा व परीक्षेत टॉप करावे. पण, काही कारणामुळे टॉप येत नाही किंवा नापास होतो. आईवडिलांच्या समजदारी अभावामुळे मुलांच्या भविष्याची काळजी करतात व तान घेतात. त्यामुळे त्यांना उच्च रक्तदाब होऊ शकतो. उदा. २) मधुमेह रुग्णांच्या हिस्ट्रीमध्ये असे दिसून येते की वडिलांची इच्छा अशी असते की, आपली मुलगी चांगल्या घरी देऊन सुखात राहावी. पण, काही कारणामुळे मुलीच्या सासरी छळ होतो. त्यामुळे वडिलांची इच्छा भंग होते व समजदारीपणाचा अभाव होतो. व त्यांना तानतणाव, सतत विचार, नैराश्य व अतिदुःख होते व घाबरल्यासारखे होते. नंतर डॉक्टरकडे तपासणी केल्यास उच्चरक्तदाब किंवा मधुमेह झाल्याचे आढळून येते. उदा. ३) लग्न झालेल्या नवदाम्प्त्याला इच्छा असते की, आपण लवकरात लवकर घर बांधावं, गाडी घ्यावी पण समजदारीच्या अभावामुळे लवकर पुढे जाण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबतात. त्यामुळे त्यांना बर्डन येते. चिडचिडपणा वाढतो. अपेक्षाभंग होतात व मानसिक आजारी होतात व पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडण वाढतात. यावरून असे लक्षात येते की, मनुष्याने निसर्गाचे नियम तोडले किंवा इच्छा व समजदारीपणा याचा अभाव राहिला, तर मनुष्य मानसिकरीत्या बिमार पड़तो व नतर शारीरिक व्याध्यानी ग्रासला जातो. त्यामुळे होमिओपथीक शास्त्रामध्ये रुणांची मानसिक व शारीरिक सखोल तपासणी केली जाते व या सर्वांचा अभ्यास करून होमिओपंथीक औषधी देऊन रुण्ण पूर्णपणे बरा केला जातो. डॉ .संतोष जटाळे ( होमिओपॅथिक तज्ञ


 

No comments:

Post a Comment