AROGYA RAKSHAK

Thursday, 6 May 2021

5/7/2020 सफाई कर्मचारी यांना होमिओपॅथी गोळ्या, हॅन्डवाॅश, व मास्क चे वाटप* वसरणी येथे आरोग्य रक्षक सेवाभावी संस्था व शुध्दोधन कापसीकर यांच्या वतीने कोरोना योद्धे सफाई कर्मचारी यांना होमिओपॅथी गोळ्या, हॅन्डवाॅश, व मास्क चे वाटप करण्यात आले. देशासह जगभर कोव्हीड 19 या विषाणूचे सावट आहे.या संकटकाळी परिस्थितीत नागरी स्वच्छतेचे कार्य करणारे महानगरपालिका सफाई कर्मचारी यांना मदतीची सलामी देण्यासाठी आरोग्य रक्षक सेवाभावी संस्थेच्या वतीने अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्यात आले यासह हॅन्डवाॅश व मास्कचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संतोष जटाळे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पञकार संरक्षण समिती दक्षिण विभाग प्रमुख चे अध्यक्ष प्रशांत बारादे हे उपस्थित होते. सफाई कर्मचारी यांनी इतरांची काळजी घेत असताना आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे मनोगत डाॅ.संतोष जटाळे सरांनी केले. कार्यक्रमास सुदर्शन गजभारे, सचिन वसरणीकर व सफाई कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गजभारे यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक शुध्दोधन कापसीकर यांनी केले.





 

No comments:

Post a Comment