AROGYA RAKSHAK

Thursday, 6 May 2021

17/5/2020 #पोलीस_विभागात_रोग_प्रतिकारक #औषधीचे_वाटप_करून_संपादक_रूपेश_पाडमूख यांचा वाढदिवस साजरा. नवीन नांदेड (प्रतिनीधी) : ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रोगप्रतिकारक औषधीचे वाटप करून, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस तथा दैनिक समीक्षाचे संपादक रूपेश पाडमूख यांचा वाढदिवस सिडको नवीन नांदेड पत्रकार संघाच्या वतीने शनिवार (ता.१६) रोजी साजरा करण्यात आला. कोरोना विरोधात लढा देण्यासाठी पोलीस अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे, या विचारातून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सिडको नवीन नांदेडच्या वतीने जिल्हा सरचिटणीस तथा संपादक रूपेश पाडमूख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे डॉ. संतोष जटाळे यांच्या मार्फत पुरवण्यात आलेल्या रोगप्रतिकारक औषधीचे वाटप करण्यात आले. यावेळी सिडको नवीन नांदेड पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील, कार्याध्यक्ष डॉ. अवधूत पाटील पवार, सचिव नितीन भूरे, संघटक विठ्ठल गिरडे, सहसचिव शिवाजी हंबर्डे, उपाध्यक्ष अजय मोहीरे, आदीजन उपस्थित होतो. डॉ. अवधूत पवार यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी थोडक्यात मार्गदर्शन केले. यावेळी संपादक रूपेश पाडमुख यांच्या हस्ते उपस्थित पोलीस अधिकारी तथा कर्मचारी यांना रोगप्रतिकारक औषधी वाटप करण्यात आली.

No comments:

Post a Comment