AROGYA RAKSHAK
Monday, 17 October 2022
17 sep 2022 आरोग्य रक्षक तर्फे RTO येथे १७ सप्टेंबर चालक दिन संपन्न दि १७ सप्टेंबर हा चालक दिन म्हणून घोषित केला असून . मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे अवचित साधून प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड यांनी ज्या चालकांनी २० ते २५ वर्षा पेक्षा जास्त काळ विना अपघात सेवा केली तसेच त्यांच्या या कार्यामुळे देशातील नागरिकांच्या प्राणाची रक्षा झाली व अप्रत्येक्षपणे त्यांच्या आरोग्याची रक्षा झाली या कार्याची दखल घेऊन चालक दिन व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त चालकाला आरोग्य रक्षक चालक म्हणून सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड RTO येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला ARTO श्री. संदीप निमसे , श्री.अविनाश राऊत , आरोग्य रक्षक संस्थे चे अध्यक्ष डॉ. संतोष जाटाळे , डोंगरे मॅडम, आरोग्य रक्षक हेल्थ मिशन चे सदस्य डॉ..सुनील देशमुख, डॉ.युवराज जाधव श्री रघुनाथ जटाळे , आकाश गिरी, अक्षय डावरे , अजीम पठाण , गजानन कुलथे एजाज पठाण , प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी ,व ST चे चालक उपस्थित होते.
16 sep 2022 प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) व सहायक वाहन कर आयुक्त नांदेड, यांची भेट .... आरोग्य रक्षक हेल्थ मिशन ला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद सर.... *सर्व महाराष्ट्र राज्यातील आरोग्य रक्षक सेवाभावी संस्था चा सभासदांनी महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांच्या संकल्पनेतून दिनांक 17 सप्टेंबर हा दिवस "वाहन चालक दिन "म्हणून साजरा करण्यात येत आहे तरी आरोग्य रक्षक सेवाभावी संस्था चा महाराष्ट्रभर सर्व सभासदांनी यंदा शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 "वाहन चालक दिन "संपूर्ण महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या वाहन चालकांना आरोग्याबाबत बाबत जनजागृती करून गुलाब पुष्प देऊन त्यांच्या प्रति आदर व्यक्त करून सर्वांनी आपापल्या परिसरामध्ये सादर करा व त्याची छायाचित्रे आरोग्य रक्षक सेवाभावी संस्था नांदेड त्यांचे कडे पाठवावे सर्वांनी " वाहन चालक दिन " संपूर्ण महाराष्ट्रात सर्व सभासदांनी साजरा करावा असे आवाहन श्री डॉ.संतोष जटाळे अध्यक्ष आरोग्य रक्षक सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य यांनी सर्वांना केले आहे*
22 aug ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ , राज्याच्या माजी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक आणि जे. जे. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता पदमश्री डॉ. तात्याराव लहाने यांची वैद्यकीय कारकीर्ती खूप महान आहे. आपच्या सारखे हजारो डॉक्टर सरांकडून पेरणा घेऊन कार्य करत असतात. सरांनी गरीब रुग्णांसाठी असंख्य नेत्र रोग शिबीर घेऊन रोग्याचे आरोग्याचे रक्षण केले. किनगाव अहमदपूर येथे आमचे डॉ. प्रशांत कांदे व डॉ. ममता कांदे यांच्या हॉस्पिटलचा उदघाट्न प्रसंगी सर किनगाव येथे आले होते. या प्रसंगी एवढ्या मोठ्या वेक्तीमहत्वाला आरोग्य रक्षक संस्थे मार्फत फुलं नाही फुलाची पखाली या उद्देशाने पदमश्री डॉ. तात्याराव लहाने सरांना आरोग्य रक्षक संस्थे तर्फे "आरोग्य रक्षक योद्धा" म्हणून सन्मानीत काण्यात आले. तसेच पदमश्री डॉ. तात्याराव लहाने याच्या उपस्तिथीत आमचे डॉ. प्रशांत कांदे व डॉ. ममता कांदे यांना आरोग्य रक्षक प्राणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी आरोग्य रक्षक संस्थे अध्यक्ष्य डॉ संतोष जटाळे , डॉ गजानन देलमाडे आरोग्य रक्षक हेल्थ मिशन ARHM चेपदाधिकारी डॉ आकाश खरे, डॉ. युवराज जाधव, व गजानन कुलथे उपस्थित होते, तसेच किनगाव येथील सरपंच व ग्रामथ उपस्थित होते.
आजादी के अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र दिना निमित्य आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत ARHM आरोग्य रक्षक हेल्थ मिशन युनिट नांदेड ची स्थापना बीड ज़िल्हा न्यायाधीश श्रीकेतनकुमार सर यांच्या हस्ते करण्यात आले. आपण सुद्धा या मिशन मध्ये स्वयंसेवी / volunteer म्हणून आरोग्य विषयक कार्य करू शकता..volunteer होण्या करिता खालील दिलेल्या लिंक वर clik करा https://forms.gle/YMTcfXs9JMHkr95x7
Subscribe to:
Posts (Atom)