AROGYA RAKSHAK

Monday, 17 October 2022

नांदेड़: दिनक ११/१०७/२२ आरोग्य रक्षक बहुउदेस्यीय सेवाभावी संथा नांदेड़ यांच्या वतीने आरोग्य रक्षक होमिओपेथिक चैरिटेबल क्लिनिक सोमेश कॉलोनी नांदेड़ येथे रक्त दान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात आरोग्य रक्षक संस्थे चे सदस्य व् डॉ. राम मुग़ल यांचे मित्र मंडल सदस्य यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून आरोग्य रक्षक सांस्थे च्या सदस्यांनी या पुढे आपला वाढदिवस रक्तदान करून साजरा करू असे ठरवले आहे.. या शिबिरातडॉ राम मुगल डॉ.सुनील देशमुख, डॉ.आकाश खरे, डॉ. प्रदिप गरुड, डॉ.प्रदीप देशमुख, गजानन कुलथे योगेश मुगल, विनोद पाटील, कोंडीबा आठवले, यांनी उस्फुर्त पणे रक्तदान केले. या रक्तदान शिबिरा साठी जिजाई ब्लड बँक सेंटर नांदेड यांचे सुरज पाटील व आरोग्य रक्षक हॉर्निओपॅथिक क्लिनिक चे डॉ.सुनिल देशमुख, डॉ. आकाश खरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरात आरोग्य रक्षक संस्थेचे अध्यक्ष डॉ.संतोष जटाळे यांनी सर्व रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन आभार मानले व या महान कार्याचे कौतुक केले. या शिबिरात डॉ.केंद्रे , विशाल गिरी व अनिल पतंगे यांची विशेष उपथिती होती .

 












No comments:

Post a Comment