AROGYA RAKSHAK

Sunday, 16 October 2022

24 OCT 2021 आज आरोग्य रक्षक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन .. नांदेड –प्रतिनिधी येथील आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर चालविण्यात येणाऱ्या आरोग्यरक्षक चॅरिटेबल होमिओपॅथीक क्लिनीक. सोमेश कॉलनी, नांदेड.येथे आज दिनांक : २४-२०-२०२१ रविवार रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ वा. पर्यंत आरोग्य तपासणी व होमीओपॅथीक शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सदरील तपासणी शिबीर हे दर महिन्याच्या ४ थ्या रविवारी आयोजित करण्यात येते या शिबीरात विविध आजारांवर विशेष उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार असून यात मुख्यतः रोग प्रतिकारशक्ती वाढवणे, श्वसनक्रियेचे आजार, जुनाट सर्दी (अॅलर्जी), सोरियासिस, इसब, इतर चर्मविकार, केसांच्या सर्व समस्या व संधीवात, थायरॉइड संबंधीचे आजार, पचन क्रियेचे आजार, मुळव्याध व भगंदर, मुत्र मार्गाचे आजार, मुतखडा, पाळीचे विकार, गर्भाशयाचे आजार व इत्यादी आजारांवर निदान व उपचार करण्यात येणार असल्याची माहीती आरोग्य रक्षक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक डॉ.संतोष जटाळे यांनी दिली.. चौकट – सदरील शिबीरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी बंधनकारक असून नोंदणी फिस – ५० रुपये असणार आहे तरी अधिक माहीतीसाठी या क्रमांकावर संपर्क - 7588585176/8888711036/ 9975045161 साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे स्थळ - आरोग्यरक्षक चॅरिटेबल होमिओपॅथीक क्लिनीक. सोमेश कॉलनी, नांदेड. वेळ - दिनांक : २४-२०-२०२१ रविवार रोजी सकाळी १० ते दुपारी ०२ वा. --------------------- आरोग्य रक्षक



 

No comments:

Post a Comment