AROGYA RAKSHAK
Sunday, 16 October 2022
१ जुलै डॉक्टर दिनानिमत्त आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे तर्फे डॉक्टरांचा सत्कार समारंभ सोहळा राष्ट्रीय आरोग्य दिनानिमित्त आरोग्य रक्षक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,नांदेड संचलित आरोग्य रक्षक चॅरिटेबल होमिओपॅथिक क्लिनिक सोमेश कॉलनी,नांदेड येथे डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डॉ.समीर कोटलवार (छाती रोग तज्ञ), डॉ. कुमार निवळीकर (दंतरोग तज्ञ), डॉ. अंजली ढवळे (होमिओपॅथिक तज्ञ), डॉ. संतोष कुमार स्वामी (होमिओपॅथीक तज्ञ) उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष जटाळे, कोषाध्यक्ष समीर जटाळे, सचिन अन्नमवार (crayons advertising, नांदेड) संस्थेचे सदस्य अनिल पतंगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्यरक्षक चॅरिटेबल होमिओपॅथिक क्लिनिक चे होमिओपॅथिक तज्ञ डॉ.सुनील देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सोपान जाधव यांनी मांडले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment