6 SEP 2021 नांदेड येथील सुप्रसिद आयुर्वेद तज्ज्ञ DR.QADRI M. J. सर यांनी आज डॉ . सॅम्युएल हानेमन होमिओपॅथिक क्लिनिक वसरणी नांदेड येथे भेट दिली. या भेटी दरम्यान आयुर्वेदिक शास्त्र व होमिओपॅथिक शास्त्र विविध आजारावर कसे पूरक परिणाम करतात यावर चर्चा झाली. तसेच आयुर्वेद, होमिओपॅथी व आरोग्य या विषयावर सुद्धा चर्चा झाली. आयुर्वेद तज्ज्ञ DR.QADRI M. J. सर हे आयुर्वेदिक शास्त्राचे अनुभवी तज्ज्ञ असून सखोल अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहे. या वेळी आरोग्य रक्षक संस्थे तर्फे सरांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सलीम शेख ( दंतरोग तज्ज्ञ, नांदेड ) उपस्थित होते.
No comments:
Post a Comment